Click Here...👇👇👇

ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 10, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे आजूबाजूच्या खेड्यातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत असतात , गोंडपीपरी तालुक्यातील  कोरोनाची वाढत असलेली परिस्थिती लक्षात घेता,नाना येल्लेवार यांनी मा.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे सॅनिटायझर मशीनची मागणी केली होती, लोकनेते सुधीरभाऊ  मुनगंटीवार यांनी काही तासातच  सॅनिटायझर मशीन उपलब्ध करून दिली.

काल ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण गोंडपीपरी येथील शेतकरी व जेष्ठ नागरिक आत्माराम पुडके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी न.प.गोंडपीपरी चे माजी नगराध्यक्ष संजय झाडे,चेतन गौर, मनीष वासमवार,  गणपती चौधरी, अश्विन कुसनाके, बालू दिनगलवार, गणेश मेरुगवार उपस्थित होते.