संपूर्ण आरोप बिनबुडाचे/राजकीय हेतुपोटी:- संतोष रडके पं. स. सदस्य व तालुका अध्यक्ष भाजपा

Bhairav Diwase
Bhairav Diwase.   Sep 11, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
नागभीड:- गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे,विस्तार अधिकारी नेवारे व तोंडरे यांच्यावर जिल्हा परिषदेचे गटनेते  सतीश वारजूरकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, राजकीय हेतूपोटी केलेले आरोप आहेत असे भाजपाचे  तालुकाध्यक्ष संतोष रडके यांनी म्हटले आहे 
नागभीड तालुक्यातील गटविकास अधिकारी प्रणाली खोचरे, विस्तार अधिकारी नेवारे, व तोंडरे यांच्याकडून मनमानी कारभार केल्या जात असून मोठ्या प्रमाणात अनियमितता  करण्यात आली आहे त्यामुळे त्याची चौकशी करण्याची मागणी सतीश वारजूरकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे ,परंतु हे आरोप बिनबुडाचे असल्याचे तालुकाध्यक्ष संतोष रडके यांनी म्हटले आहे,.
 गेल्या वर्षभरात कोणतेही मनरेगाचे चुकीचे काम झालेले नाही परंतु सतीश वारजूरकर यांचा पंचायत समितीमध्ये काही अधिकार नसताना वारंवार येथे येऊन कामकाजामध्ये हस्तक्षेप करून नागभीड पंचायत समितीला बदनाम करण्याचा डाव वारजुरकर यांचा असून, जेव्हापासून गटविकास अधिकारी खोचरे मॅडम आल्या तेव्हा पासून चांगला कारभार चालू असून त्यांचा नागभीड प स मध्ये चांगला काम केल्यामुळे पस च्या मासिक मिटिंग मध्ये अभिनंदन ठराव सुद्धा घेतलेला आहे उलट अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न वारजूरकर करत असतात. अशा कोणत्याही प्रकारच्या नागभीड येथील पंचायत समितीमध्ये प्रकार झाला नसून सतीश वारजुरकरांच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे नियमबाह्य काम या पद्धतीने चालू देत नसल्यामुळे या पंचायत समितीला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष आणि पंचायत समिती सदस्य संतोष रडके यांनी आधार न्यूज नेटवर्कच्या प्रतिनिधी सोबत बोलताना सांगितले आहे.