(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुराचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे हे कोरोना बाधित झाले आहे. केलेल्या चाचणीत त्यांच्या अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. तहसील प्रशासनाने दुजोरा दिला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची स्वतःची चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले असून कोरोनाचा वाढता पादुर्भाव बघता नागरिकांनी प्रशासन मार्फत निर्दिष्ठ नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षा करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.