पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू. छोटा मजरा येथील घटना.

Bhairav Diwase. Sep 20, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
वरोरा:- काल आनंदवन परिसरातील शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या युवकांचा पाण्यात बुडून करून अंत झाल्याची घटना घडली आहे. मृतकाचे नाव राजू कवडू परसे (32) असून तो मौजा छोटा मजरा येथील रहिवासी होता. काल दिनांक 19 सप्टेंबरला सकाळी दहा वाजता तो घरून गेल्यापासून परत आला नव्हता. सगळीकडे शोधाशोध केली असता आनंदवन परिसरातील एका शेत तलावाजवळ त्यांची मोटरसायकल, कपडे व पादत्राणे आढळून आली. त्यामुळे लगतच्या तलावात पोहण्यास गेला असावा. व त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला असावा असा कयास लावला जात सदर तलावात मच्छीमारांना उतरवून पाण्यात पाहणी करण्यात आली परंतु रात्री उशिरापर्यंत त्याचे प्रेत हाती लागले नव्हते अशातच आज सकाळी त्याचे प्रेत पाण्यावर तरंगत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले त्यांनी लागलीच पोलिसांना कळविले. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचून प्रेत ताब्यात घेतले व उत्तरीणीय तपासणीसाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने