Click Here...👇👇👇

गोंडपिपरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करावे:- आमदार सुभाषभाऊ धोटे.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.    Sep 23, 2020

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:-
गोंडपिपरी येथे गेली अनेक वर्षापासुन महाराष्ट्र राज्य पणन महासंघ यांचे कडुन शेतकऱ्यांचा कापुस खरेदी केल्या जात होता. गोंडपिपरी येथील खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. यावर्षी गोंडपिपरी तालुक्यात कापसाचा फेरा वाढलेला असून मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याची शक्यता आहे. गोंडपिपरी तालुका व परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्र नसल्याने आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी येथे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे.
गोंडपिपरी तालुका कापुस उत्पादक क्षेत्र असुन सन 2020-21 या वर्षात 17993 हेक्टर कापासाची लागवड झालेली आहे. लगतच्या पोंभुर्णा तालुक्यात सुध्दा 5457 हेक्टर कापुस पिकाची लागवड झालेली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापुस लागवड केलेली आहे. कापुस लागवडी खालील क्षेत्रानुसार चालु हंगामात जवळपास 3 ते 4 लक्ष क्विंटल कापुस उत्पादन होऊन गोंडपिपरी येथे सभोवतालच्या परीसरामधुन मोठ्या प्रमाणात कापसाची आवक होण्याची शक्यता आहे. यावर्षी किमान आधारभुत किमंत देऊन कापसाची खरेदी होणार आहे- परंतु गोंडपिपरी येथे शासनाचे कापुस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पडेल त्या भावात कापुस विकावा लागणार आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल या सर्व बाबींचा विचार करून परीसरातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गोंडपिपरी येथे कापुस उत्पादक पणन महासंघाकडुन गोंडपिपरी येथे कापुस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी राजुरा विधानसभा मतदार संघाचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदान्द्वारे केली आहे.