(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- लॉकडाऊनमुळे संपूर्ण शाळा व कॉलेज बंद आहेत. शाळेत विद्यार्थांना येण्यास मनाई आहे. परंतु शिक्षकांना शाळेत हजर राहणे आवश्यक असल्यामुळे विश्वशांती विद्यालय सावली येथील शिक्षक रोज शाळेत जात होते. दोन दिवसापूर्वी येथील शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती व आज दुपारी दोन शिक्षकांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. सुरवातीला तहसील कार्यालय नंतर पोलीस स्टेशन, पंचायत समिती व आता शाळेत कोरोनाने प्रवेश केला आहे. सावलीच्या सर्वच कार्यालय व शाळेत कोरोना आपले पाय पसरत आहे. त्यामुळे सावली शहर वासियांना जागरूक राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आज सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात सुद्धा सहा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.