संजय गांधी, श्रावणबाळ योजनेत बोगस लाभार्थ्यांचा भरणा.

Bhairav Diwase
तालुक्यात 15 हजार 801 लाभार्थ्यांचा समावेश.

सावलीत संजय गांधी 100, श्रावणबाळ 780 लाभार्थी.

अनेक गरजू लाभार्थी वंचित.
Bhairav Diwase.    Sep 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- शासनाच्या जणकल्यांकारी योजने अंतर्गत ग्रामीण भागातील आथिर्क दुर्बल घटकांना लाभ मिळून त्यांच्या गरिबीचे उचाटन व्हावे म्हणून अनेक योजनां कायान्वित करण्यात आल्या असल्या तरी प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे अनेक योजनांना ग्रहण लागण्याची वेळ निर्माण होत आहे परिणामी गरजू लाभार्थ्यांना वंचित राहावे लागत आहे अशाच शासनाच्या संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेत बोगस लाभारत्याचा भरणा झाला असल्याचा आरोप वंचित असलेल्या लाभार्त्यांकडून केला जात आहे त्यामुळे तालुक्यातील गरजू लाभार्थी सदर योजनेपासून मुकल्या गेले असून सदन आणि धनदांडग्यांच्या भरणा केला गेल्याची  गंभीर बाब समोर येत आहे
   शासनाने श्रावणबाळ योजना व संजय गांधी योजना या निराधार, वृध्द, अपंग, भुमीहिन अशा लोकांना त्यांचे जिवनमान उंचावावे, सोबतच कोणावर अवलंबून न राहता स्वता चांगले जिवन जगता यावे यासाठी अशा जनकल्याणाकारी योजना कार्यान्वित केल्या परंतु आजची परिस्थिती बघता धनदांडग्या चा समावेश या योजनेत दिसुन येत आहे , त्यामुळे गरजवंत लाभार्थी दुरावला जात आहे संजय गांधी निराधार योजनेत 600 पासून 1000 रू पर्यंत अनुदान दिले जात असून त्यात विधवा, अंध, अपंग, कुष्ट्ररोगी, अविवाहित, वृध्द, घटस्फोटित, निराधार अश्याचा समावेश करण्यात येतो तर श्रावणबाळ  येजनेत बी पी एल आणि जांच्ये उत्पन्न 21हजार रु पर्यंत  जांचे वय 65 वर्ष पुढे असणाऱ्या चा समावेश करण्यात आला केंद्र सरकार 200 आणि राज्य सरकार 800 असे 1000 रु अनुदानाची तरतूद असताना अश्या आर्थिक  दृष्ट्या दुर्बल घटकाशाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या योजनेत गरज वंताणा वगळण्यात आल्याचां आरोप करण्यात येत आहे  तालुक्यात 15 हजार 801 लभार्त्याचा समावेश असून सावली शहरात संजय गांधी 100 तर श्रावणबाळ 780  लभरत्यांचा समावेश आहे सदर योजनेवर नियंत्रण म्म्हणून संजय गांधी निराधार योजना शासकीय अशासकीय पदाधिकारी समिती नेमली असताना गरजवंताला डावलून बोगस लाभार्थ्या चां समावेश कसा करण्यात आला असा प्रश्न निर्माण केल्या जात आहे ए वढेच नाही तर सदर योजनेचा लाभ मिळावा म्हणून आलेल्या गरजवता कडून तुमचे काम करून देतो या सबबी खाली  पैश्याची लयलूट केली जात आहे अनुदान वेळेवर दिले जात नाही  कोरोनाच्या काळात तर तीन ते चार महिन्यांपासून अनुदान देण्यात आले नाही अनुदानासाठी गरीब गरजूंना हेलपाठ्या मारण्याची वेळ निर्माण होत आहे एकंदरीत शासनाच्या ह्या जंकल्यांकारी योजनेत गरज वंता ना डावलण्यात येत असल्याने सदर योजनेची फेर तपासणी करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.