(आधार न्यूज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव डी दिवसे जिल्हा चंद्रपूर
बल्लारपूर:- आज दि. 09/10/2020 रोजी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आमदार निधीमधून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जनतेचे आरोग्य उत्तम राहावे याकरिता भाजपा ज्येष्ठ नेते चंदनसिंहजी चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीशजी शर्मा तसेच भाजपा शहराध्यक्ष काशिनाथ सिंह यांच्या नेतृत्वात बल्लारपूर शहरात विविध 21 ठिकाणी ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाले त्यातच बल्लारपूर एलआयसी ऑफिस मध्ये शाखा प्रबंधक श्री.कुकूडकर साहेब व भाजयुमो जिल्हा महामंत्री आशिषजी देवतळे तसेच बल्लारपूर शहर सचिव संजयजी वाजपेयी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीनचे लोकार्पण करण्यात आले व सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना मास्क व आर्सेनिक अल्बम थर्टी रोगप्रतिकारक्षमता वाढवणार्या गोळ्या चे वितरण करण्यात आले यावेळी एलआयसी ऑफिसचे समस्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिलेले बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे बल्लारपूर एलआयसीचे शाखा प्रबंधक श्री.कुकूडकर साहेब यांनी आभार मानले.
जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहिलेले बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे बल्लारपूर एलआयसीचे शाखा प्रबंधक श्री.कुकूडकर साहेब यांनी आभार मानले.