वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पोंभूर्णा चे महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका युवतीवर सामुहिक बलात्कार करून जिभ कापण्यात आली,कमरेचा मणका तोडण्यात आला हि घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे जातीवादी सरकारच्या नाकर्तेपणा मुळे तिचा जिव गेला ति जातीव्यवस्थेची बळी ठरली.नराधमांना फासीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका पोंभुर्णा व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पोंभूर्णा यांनी महामहीम राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदन तहशीलदार मार्फत देण्यात आले.
उत्तर प्रदेशातील जातीवादी मानसिकतेचे योगी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी. तसेच या प्रकरणात पोलिसांची भुमिका संशयास्पद असुन पिडीताचा अंतिम संस्कार करण्यात पोलिसांनी घाई करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला यात दोषी असणार्या पोलिस अधिकारी यांच्यावर हि त्वरीत कारवाई करुन त्यांना हि शिक्षा देण्यात यावी. अशी मागणी हि करण्यात आली आहे.निवेदन देताना चंद्रहास उराडे तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,रवी तेलसे तालुका महासचिव, श्यामकुमार गेडाम जिल्हा उपाध्यक्ष, अतुल वाकडे तालुका अध्यक्ष, ॲड रंजित खोब्रागडे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, संदीप निमसरकार उपाध्यक्ष, रघुनाथ उराडे शहर अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, राजु खोब्रागडे शहर अध्यक्ष अविनाश वाळके जिल्हा प्रमुख आयटि सेल चंद्रपूर, महेंद्र उराडे, सुनिल दुर्गे, संतोष कवठे, मुन्ना घडसे, विजयकुमार दुर्गे, प्रकाश.एस.तावाडे, माया मुन, नरहरी मानकर,मंगला मानकर, मंगला उराडे, रिणा उराडे, भारती उराडे, स्मिता उराडे, इंदिरा लाकडे, कल्पना घडसे, गिता उराडे, विजया भसारकर, कपिलदास उराडे, प्रमोद रामटेके, दुशिलाताई उराडे, वच्छलाबाई उराडे, शालिक तेलसे, प्रनित माणकर, पराग उराडे, मंगलदास लाकडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.