शाहिद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती तर्फे शाहिद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 21, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- राष्ट्रीय क्रांतीकारी शहीद21 योद्धा विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठविला. त्यांनी केलेल्या देशहिताचे कार्य सम्पूर्ण देश भरात समरणात आहे एवढ्या कमी वयात त्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले 2त्यांच्या समोर चांगले चांगले इंग्रज अधिकारी सुद्धा फिके पडले अशा त्यांच्या या संघर्षाचे योगदान समाजाला सदैव स्मरणात राहावे यासाठी शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती, गडचांदूर तर्फे आज दिनांक २१ऑक्टोबर २०२० रोजी त्यांच्या १६२ व्या शहीद दिनी शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके चौक, गडचांदूर येथे त्याच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी उपस्थित शहीद क्रांतिवीर बाबुराव शेडमाके स्मारक समिती,गडचांदूर चे पदाधिकारी आणि सदस्य महेश परचाके, स्वप्नील आत्राम अनिल सिडाम प्रफुल्ल कोटनाके कुंडलिक सिडाम विजय मडावी, शुभम आत्राम, स्नेहल अलाम मेगराज मडावी मनोज उईके, शंकर परचाके, जगदीश कुळमेथे अनिल मडावी रामू सिडाम प्रामुख्याने उपस्थित होते.