कोविड १९ च्या आगमनापासून राबवित आहेत अनेक उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- कोविड १९ च्या आगमनापासून सावली तालुक्यात भाजपा तर्फे अनेक उपक्रम राबवित प्रशासनाला सहकार्य करीत आहेत.असाच उपक्रम राबवित सावली शहरात भाजपा तर्फे मास्क वाटप करून शहरातील लोकांना कोरोनापासून बचाव हा संदेश दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव चालू झाल्यापासून अनेकजन घाबरून गेले.प्रशासनाने कोरोना रुग्ण संख्या वाढू नये यासाठी विविध नियम लावित लॉकडाउन सारखे निर्णय घेतले.यातच अनेक संघटना,संस्था इत्यादिनी प्रशासनाला सहकार्य म्हणून मास्क व सेनीटायझर वाटप,रक्तदान शिबिर घेऊन सहकार्य केले.पण आपले उपक्रम नियमित चालू ठेवित भाजपा तर्फे सावली शहरातील काही प्रभागातील नागरिकांना कोविड १९ चा सामना करण्यासाठी जवळपास ५००हुन अधिक मास्क चे वितरण संजय गांधी निराधार योजना तालुका अध्यक्ष तथा भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांचा नेतृत्वाखाली वाटप करण्यात आले.सावली तालुक्यात व शहरात सद्या कोविड चे रुग्ण निघत आहेत.त्यामुळे सतर्क राहून एक मिटर दुरी राखा व मास्क लावूनच बाहेर जा, विनाकारण बाहेर फिरू नका, आणि 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेत सर्वजण सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ही यावेळी सतीश बोम्मावार यांनी जनतेला केले.