राजुरा, कोरपणा, जिवती आणि गोंडपीपरी या चार तालुक्यातील युवक-युवतींची सामाजिक चळवळ.
ग्रामीण भागातील उगवत्या नेतृत्वाला पुढे येण्याची संधी.
समाजातील शोषित घटकांना कायदेशीर न्याय मिळवून देण्याचा चळवळीचा मानस.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी या चार तालुक्यातील युवक-युवतींची 'ग्रामीण युवा मंच' ही चळवळ असून समाजातील युवक, युवती, महिला, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्व शोषित घटकांना कायदेशीर न्याय मिळवून देणे हा सदर चळवळीचा मुख्य उद्देश आहे. आपल्या परिसरातील प्रत्येक उगवत्या नेतृत्वाला एक नवं व्यासपीठ मिळावं, वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व यातून प्रत्येक युवकांनी समोर येवून अन्यायाविरुद्ध पेटून उठावं आणि या भुमीचं देणं म्हणून सर्वांनी समाजकार्यात उतरून शोषितांना आपल्या कर्तृत्वातून न्याय मिळवून देण्याची संधी या चळवळीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. समाजात होणारे स्त्रियांवरील आघात, घटस्फोटित महिला, शेतकऱ्यांवर होणारे अन्याय, शेतमजूर, कामगार आणि सर्व शोषित, पीडित, वंचित घटकांचे होणारे शोषण या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम सोबतच स्त्रियांवर होणारा कौटुंबिक हिंसाचार यासंदर्भात महिला मंडळ आयोगाची मदत किंवा चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून घरोघरी न्याय मिळवून देण्याची संकल्पना "ग्रामीण युवा मंच" या चळवळीच्या माध्यमातून गावोगावी राबविण्याच्या मानस आहे. त्याकरिता सदर चळवळीची चार तालुक्याची एक कार्यकारिणी समिती गठीत करण्यात आली असून मंचाचे अध्यक्ष प्रदिप बोबडे, उपाध्यक्ष सचिन झाडे, सचिव सुरज लेडांगे, सहसचिव ऋषिकेश वासेकर, कोषाध्यक्ष गोपीनाथ बोरुले, संघटक शुभम गौरकार, सल्लागार मयुर एकरे, दीपक शर्मा, मीडिया प्रभारी प्रणय निमसरकार, सहप्रभारी संतोष दहिवले यांची नियुक्ती करण्यात आली तर कार्यकारिणीचे समन्वयक म्हणून चंदू झुरमुरे, आदित्य आवारी, नामदेव देवकते, मारोती तोतापल्ली, विशाल जाधव, सुरज सिडाम,प्रमोद विरुटकर,विजू डहाले,आकाश ताविडे, प्रकाश उपरे, श्रीकांत मुसळे, गायत्री उरकुडे, काजोल शेख, साक्षी ठमके,पल्लवी सोनूर्ले, प्राची लेडांगे, तेजस्वी मामिलवाड यांची निवड करण्यात आली.
उठ तरुणा जागा हो, ग्रामीण युवा मंचाचा धागा हो...
"ग्रामीण युवा मंच" हि राजुरा, कोरपणा, जिवती आणि गोंडपीपरी या चार तालुक्यातील युवकांची चळवळ असून सदर चळवळीचा उद्देश खालीलप्रमाणे आहे.
समाजातील सर्व युवक, युवती, महिला, शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि सर्व शोषित, वंचित, पिडित घटकांना कायदेशीर न्याय मिळवून देणे.
🔶समाजात भारतीय संविधानाच्या मूल्यांचा आणि हक्क व अधिकाराचा जागर करणे.
🔶युवा वर्गाला चळवळीच्या माध्यमातून नवं व्यासपीठ मिळवून देणे.
🔶समाजात विविध कायद्यांविषयी जनजागृती निर्माण करणे.
🔶नेत्र शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिराचे आयोजन करणे.
🔶बालकांकरिता सुसंस्कार शिबिराचे आयोजन करून संस्कारक्षम नेतृत्वशील युवक तयार करणे.
🔶युवती व महिला यांच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार घेवून कार्यशाळेचे आयोजन करणे.
🔶चळवळीच्या माध्यमातून व्याख्याने व समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेवून स्वच्छतेचे महत्व पटवून देणे.
🔶गावागावात अभ्यासिका सुरु करून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करणे.
🔶महिलांच्या तक्रारीसंदर्भात प्रत्येक गावात तक्रार पेटी लावून समस्या जाणून घेणे.
🔶युवकांकरीता कवी संमेलने,वर्तृत्व स्पर्धा इत्यादी आयोजित करणे.
🔶चंद्रपूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच महिला मंडळ आयोगामार्फत कायदेशीेर न्याय मिळवून देणे.
🔶कृषी क्षेत्राच्या विकासाला गती देण्याकरिता कृषी कार्यशाळेचेे आयोजन करणे.
🔶जेष्ठ नागरीकांकरिता समुपदेशन केंद्र सुरु करणे. हे सर्व मुद्दे तात्काळ सोडवणे हे मुख्य उद्धिष्ट राहील.