एक हायवा जप्त; २ लाख ४६ हजार रुपये चा दंड.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:- सोमवारला रात्री घुग्घुस येथुन जवळच असलेल्या नकोडा चिंचोली रेती घाटांवर १५ ते २० ट्रँक्टर ट्रालीने अवैध रेती तस्करी सुरु असल्याने हि माहिती जिल्हाधिकारी चंद्रपुर मिळताच त्यांनी अल्का खेडकर उत्खनन अधिकारी यांना पाठविले त्यांनी रेती घाटावर धाड टाकून एक रेतीचा एक हायवा जप्त करुन नायब तहसीलदार कार्यालयात लावला.
४ ब्रास रेतीच २ लाख ४६ हजार रुपये चा दंड ठोकला आहे. काही दिवसापूर्वी महसूल विभागाने रेती घाटावर धाड टाकून चार ट्रँक्टर जप्त करून दंड वसूल केला होता तर घुग्गुस पोलिसांनी रेती घाटावर धाड टाकुन तिन ट्रँक्टर जप्त केले होते. यात चालक मालकांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
परंतु घुग्गुस येथील रेती तस्करांची मुजोरी कायम आहे. हि कारवाही उत्खनन अधिकारी अल्का खेडकर, वरखडे, मोडके यांनी महसूल व पोलिसांच्या पथकासह केली