पुनर्वसनाच्या प्रश्नावर केली ग्रामस्थांशी चर्चा.
नागपूर:- नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील चापेगडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिचघाट येथील जनतेच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रहार सेवक शेरखान भाऊ पठाण चिचघाट येथे जाऊन समस्या जाणून घेतल्या.
नागपूर जिल्ह्यातील कुही तालुका अंतर्गत येत असलेल्या चिचघाट येथे पुराच्या पाण्यामुळे पूर्ण गाव व शेती ही पुराच्या पाण्यात येत असून ग्रामवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेकदा पुरामुळे नागरिकांना तसेच बालकांना जीव गमवावा लागला आहे... विद्यार्थ्यांची शालेय शिक्षण समस्या भरपूर प्रमाणात आहे. ह्या सर्व बाबींचा विचार करता तेथील नागरिकांनी अनेक दिवसापासून पुनर्वसनाची मागणी केली आहे. अनेकदा निवेदन देऊन सुद्धा प्रशासन या कडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे.. हीच समस्या चंद्रपूर जिल्ह्यातील प्रहार सेवक शेरखान पठाण यांना सांगितली असता तात्काळ चिचघाट येथे जाऊन तेथील समस्यां जाणून घेतल्या व न्याय देण्याचे आश्वासन दिले. पुराच्या पाण्यामुळे काही विजेचे खांब पडले होते लगेच तेथील विद्युत अभियंता यांचेशी चर्चा करून विद्युत व्यवस्था सुरळीत करण्याचे सांगितले. विद्युत अभियंता यांनी दोन दिवसात विद्युत पुरवठा सुरळीत सुरु करून देण्याचे आश्वासन दिले.. या वेळी उपस्थित ग्रामस्थ तथा प्रहार सेवक शेरखान पठाण, विनोद उमरे, अतुल निंबाळकर, मुझीत उपस्थित होते