(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) संजय मेकर्तीवार, मुल
मुल:- भारतीय जनता पार्टी मुल तालुक्याचे जेष्ठ नेते तथा पं. स. चे उपसभापती मा. श्री. घनश्यामजी जुमनाके यांचे आज घरीच 5:00 वाजताच्या सुमारास हृदयविकाराचे झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. पंचायत समितीचे उपसभापती मान. घनश्यामजी जुमनाके हे चिमढा या गावचे आहेत त्यांना अचानक ह्रदयविकाराच्या झटका आल्याने आकस्मिक निधन झाल्याने मूल पंचायत समिती तसेच चिमढा गावामध्ये शोककळा पसरली आहे. उघा बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती आणि परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो!
*भाजपचा सच्चा कार्यकर्ता हरपला : आ. सुधीर मुनगंटीवार*
मुल पंचायत समितीचे उपसभापती श्री घनश्याम जुमनाके यांच्या निधनाने भाजपचा सच्चा
कार्यकर्ता हरपला अशी शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे
जनतेच्या हाकेला तत्परतेने ओ देणारा कार्यतत्पर लोकप्रतिनिधी, ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांची जाण असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टी परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या परिवारावर कोसळलेल्या दुःखात भाजपा परिवार सहभागी असल्याची भावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
आधार न्यूज नेटवर्क परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐