सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा चंद्रपूर येथील एस. आर. सोशल वर्क कालेज व आखिल भारतीय विध्यार्थी परिषद जिवती यांच्या संयुक्त विद्यमाने शेणगाव येथे भव्य रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 19, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क ,चंद्रपुर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , जिवती च्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रम शेणगाव तालुका जिवती येथे आयोजित करण्यात आले .या शिबिराचे मुख्य आयोजक राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक श्री.महादेव केंद्रे, सचिन लांडगे ,ऑगस्तीन गायकवाड, श्री. सचिन केंद्रे श्री.मिथुन फड,श्री.जिवन तोगरे कैलास लांडगे विद्यार्थी होते .यांनी अतिशय परिश्रम घेऊन शिबिराचे छान नियोजन करून30 रक्तदात्यांनी रक्तदान केले..या शिबिराचे उद्घाटन व अध्यक्षीय शुभेच्छा मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील साकूरे यांनी फेसबुक पेज वरून फेसबुक लाईव्ह करून विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा करून आनंद व्यक्त केला. आतापर्यंत महाविद्यालयाने ०७ रक्तदान शिबिर घेतले, त्याचप्रमाणे ०६ ठिकाणी पर्यायी शाळा विद्यार्थ्यांनी आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी राहून शाळा सुरू केल्या . आजच्या भव्य रक्तदान शिबिर याकरिता आयोजक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
            या कार्यक्रमात श्री अमरजी राठोड नगरसेवक , जिवती श्री अशपाक शेख उपाध्यक्ष नगरपंचायत जिवती
 प्रा. प्रवीण गिलबिले जिल्हा संयोजक अभाविप ,श्री दामोदरजी दिवेदी, जिल्हा विद्यार्थी विस्तारक उपस्थित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रक्त संक्रमण अधिकारी डॉ.आनंद हजारे व समाजकार्य समाजसेवा अधीक्षक श्री संजय गावित प्रयोगशाळा तंत्रज्ञ व त्यांची टीम यांनी या रक्तदान शिबिर मध्ये रक्तदात्यांचे रक्तदान घेऊन covid-19 चे सर्व व नियम पाळून रक्तदान शिबिर यशस्वी केले.
         या भव्य रक्तदान शिबिर वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन रा. से. यों. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सुभाष गिरडे कार्यक्रम अधिकारी , प्रा. किरनकुमार मनुरे यांनी केले.