(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील सतत च्या अतिवृष्टी पावसाने जिवती तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला असून सतत च्या पावसाने येथील शेतकरी हवालदिल झाला असून येतील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी मोठया संकटात सापडला असून येथील स्थानिक मुदा म्हणजे संपूर्ण तालुका हा अतिक्रमण असून येथील शेतकऱ्यांना शेत जमिनीचे सातबारा पट्टे नसल्याने शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याने संपूर्ण शेतकरी वर्ग हा निराशेच्या खाईत सापडला आहे.व येथे स्थायिक मुद्दे ही अनेक असल्याने आम आदमी पार्टी जिवती यांनी वरील विषयाला धरून शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत.यात यावेळी पक्षाचे तालुका सचिव सचिव श्री गोविंद गोरे,बाबू पवार, गजानन राठोड, सुनील राठोड, चंद्रकांत मोरे, श्रीराम सामप शेख मुदम करीब व जीवन तोगरे अशोक पोले,रामू आत्राम एकूणच राज्यातील
शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे. त्यामुळे सरकार कडून शेतकऱ्यांना मदत
मिळणे गरजेचे आहे, म्हणून आम आदमी पार्टी तर्फे खालील मागण्या करण्यात आल्या.
1. राज्यात ओला दुष्काळ, जाहीर करावा,
2. जिवती तालुक्यातील अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना जमीन सातबारा पट्टे देण्यात यावेत.
3. नुकसान झालेल्या पिकांसाठी प्रती हेक्टर दिल्ली सरकार प्रमाणे ५० हजार रुपये मदत जाहीर करावी.
4. कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावेत,
5. सोयाबीन, धान व कपाशी खरेदी हेतू सरकारी यंत्रणा उभी करावी (MSP नुसार सरकारी खरेदी चालू करावी)
6. पूर्व विदर्भात मानव निर्मित पूरामुळे झालेली नुकसान भरपाई कोकणात दिलेल्या मदती प्रमाणे देण्यात यावी.
7. राज्यात जेथे जेथे फळबागांचे नुकसान झाले आहे, तेथे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
8. ज्या शेतकऱ्यांना मागच्या दोन कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.
9. त्यांना कर्ज माफी देण्यात यावी.
10. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेता राज्यात ओला दुष्काळ जाहीर
11. करून वरील मागण्या तातडीने मान्य कराव्यात ही या बाबतीत तहसीलदारद्वारा मुखमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.