पालक वर्ग जागरूक होणार केव्हा?
पालक वर्ग आपल्या मुलीची समाजात होणाऱ्या बदनामीच्या पोटी पोलिसात तक्रार दाखल करत नाही?
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- तालुक्यातील गडचांदूर शहरात दिवसेंदिवस अल्पवयीन मुलीवर विनयभंगाच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. कारण पालक वर्ग आपल्या मुलीची समाजात होणाऱ्या बदनामीच्या पोटी पोलिसात तक्रार दाखल करत नाही. त्यामुळे असल्या नराधमांची हिंमत वाढली आहे. शहरात पाठोपाठ तिन विनयभंगाच्या घटना घडल्या असून, आता तरी मुलींच्या पालक वर्गाने जागृत होवून ह्या नराधमांची पोलिसात तक्रार दाखल करुन यांना कायदा काय असते दाखवून द्यावे. त्यामुळे अशा नराधमांवर थोडी तरी भिती निर्माण होईल. नाही तर हे समाज कंटक नराधम उजळ माथ्याने समाजात फिरत राहणार.
एक घटना शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या हरदुना या गावात अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत गडचांदूर शहरातील नामांकित शिक्षण संस्थेच्या शिक्षकाने विनयभंग केला होता. त्यावेळी अचानक मुलींच्या पालकांच्या आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आर्थिक आणि राजकीय दबाव आणून प्रकरण दडपण्यात आले होते.
दुसरे प्रकरण शहरातील प्रतिष्ठित किराणा दुकान मालकाने दुकानात काम करणाऱ्या गरिब असाह्य मुलीं चा फायदा घेत विनयभंग केला. आणि मग प्रकरण पैश्याच्या भरोशावर दडपण्यात आले होते.
तिसरे प्रकरण दोन दिवसांपूर्वी एका संगीत शिक्षकाने संगीत शिकणान्या तेरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्यांनीचा विनयभंग केला असता तिच्या पालकांनी सुध्दा त्या संगीत शिक्षकाची तक्रार दाखल केली नाही. कारण पालक वर्ग आपल्या मुलीची समाजात होणाऱ्या बदनामीच्या पोटी पोलिसात तक्रार दाखल करत नाही.
त्यामुळे अशा नराधमांची हिंमत वाढली जात असते आणि पुन्हा पुन्हा असे गुन्हे करतात. म्हणून अशा गुन्हेगाराची जर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तर यांच्यात काही तरी फरक पडणार आहे. आता तरी पालक वर्गाने जागृत होवून अशा नराधमांच्या विरोधात न्यायासाठी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येवून अशा नराधमांवर भिती निर्माण झाली तर अशा प्रकारचे प्रकरणावर आळा बसेल असे जाणकारांचे मत आहे.