बल्लारपूर कॉलरी मार्गावर वातावरण तणावपूर्ण.
बल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील कॉलरी मार्गावर मस्जिद समोरील रस्त्यावर सूरज चौबे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी चारचाकी वाहन कार वर सायंकाळी 6:00 वाजताच्या सुमारास हल्ला केला असून या हल्ल्यात चारचाकी वाहनांच्या मोठे नुकसान झाले असून या हल्ल्यात चारचाकी वाहनात असलेल्या व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. सदर हल्ल्याची माहिती होताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून मात्र हल्ल्याचे कारण समजू शकले नाही.