Bhairav Diwase. Oct 31, 2020
वरोरा:- आज दिनांक ३१/१०/२०२० रोज शनिवारला, किसान युवा क्रांती संघटनेची वरोरा तालुका संपुर्ण टिम वरोरा तालुक्यातील शेगाव भागामधील मध्ये, पारडी, गिरोला, माकोना येथील अतिवृष्ठीमुळे झालेल्या धान पिकांची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. या शेतकऱ्यांची समस्या जानली असता अजुन पर्यंत प्रशासना कडुन या भागाचे पंचनामे झालेले नाही. या भागातील शेतकऱ्यांचे धान पिकांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकासान झालेले आहे.
या वेळी किसान युवा क्रांती संघटने कडुन शेतकऱ्यांना योग्य न्याय देवु असं सांगण्यात आले आहे. यावेळी उपस्थिती किसान युवा क्रांती संघटनेचे वरोरा तालुका अध्यक्ष शुभम कोहपरे, तालुका उपाध्यक्ष वैभव देवतळे, तालुका प्रवक्ता अनिकेत भोयर, अभिजित जुनघरे, आशिष लडके तसेच संघटनेचे आदी पदाधिकारी उपस्थित होते