चंद्रपूर जिल्ह्यात वाढतेय गुन्हेगारी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- कौटूंबिक वादातून चुलत भावाने धारदार वस्तूने हल्ला केल्याने एकजण जखमी झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील सूकवासी येथे बुधवारचा रात्रौला घडली. या घटनेतील जखमीला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आहे. हल्ला करणारा इसम फरार असून धाबा पोलीस शोध घेत आहेत.
तालुक्यातील सुकवासी येथे बुधवारचा रात्रौला कौटुंबिक वादावरून धारदार वस्तूने सचिन जोगेश्वर चौधरी यांने बंडू चौधरी यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात बंडू चौधरी यांना गंभीर दूखापत झाली. जखमी असलेल्या बंडू चौधरी यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.दरम्यान सचिन चौधरी फरार असून धाबा पोलीस शोध घेत आहे.

