(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- जिल्ह्यातील दारू बंद झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची विक्री आणि वाहतूक होताना आढळून येत आहे आज पहाटे चार वाजताच्या दरम्यान पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सिनेस्टाईल पाठलाग करून अवैद्य दारू विक्री करणारी होंडा सिटी गाडी पकडली आहे .
अधिक माहितीनुसार आज पहाटेच्या चार वाजताच्या दरम्यान पोलिसांनी गोंडपिपरी -मुल मार्गा वरून एका होंडा सिटी कारने अवैद्य दारूची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली त्या माहितीला गांभीर्याने घेऊन पोलिसांनी संबधित मार्गावरील चौकात गस्त लावली असता सदर मार्गाच्या दिशेने एक होंडा सिटी कार जाताना आढळून आली पोलिसांनी संशय व्यक्त करून गाडीचा पाठलाग सुरू केला हा प्रकार गाडी चालकाच्या लक्षात येताच चालकाने गाडीचा वेग वाढविला आणि खराळपेठ गावा जवळिल सुनसान जंगल परिसरात गाडी थवून अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता सात करण्याचे बाग सुपर सोनिक राकेट संत्रा देशी दारू असे लेबल असलेली प्रत्येकी शंभर नका असे एकूण 709 संत्रा देशी दारू किंमत 70 हजार रुपये चामाल व होंडा सिटी कार क्रमांक एम एच चौतीस सीपी 15 39 जुनी वापरलेली किंमत दोन लाख पन्नास हजार रुपयाचा असा एकूण तीन लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या आढळून आला अज्ञात फरारी आरोपीविरुद्ध 65 मुंबई दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला सदर कार्यवाही ठाणेदार संदीप दुबे यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी देवेश कटरे प्रफुल कांबळे संतोष काकडे विवेक राहणाऱ्या चेक यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.