मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल अल्पसंख्यांक आवास योजना तयार करून.

Bhairav Diwase
मॉ फातिमा आवास नामकरण करण्याचे निर्देश.
Bhairav Diwase. Oct 22, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्यांक समाजासाठी स्वतंत्र आवास योजना रमाई शब्री अहिल्याबाई होळकर योजनेच्या धर्तीवर तयार करण्याची मागणी जनसत्य ग्रह संघटनेच्या माध्यमातून मदत व पुनर्वसन इतर मागा स कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार व मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मा फातिमा जयंतीनिमित्त अल्पसंख्यांक समाजाच्या प्रथम शिक्षिका यांच्या नावाने सुरु करावी अशी मागणी करण्यात आली होती मागणीची दखल घेत मंत्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतली असून अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय मुंबई यांना आदेश देऊन अल्पसंख्यांक समाजासाठी घरकुल योजना ग्रामीण व शहरी भागासाठी तयार करून योजनेचे नामकरण मा फातिमा आवास योजना करण्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून संबंधित विभागाला निर्देश दिले असल्या ने अल्पसंख्याक समाजाला हक्काचा निवारा मिळण्याची संधीप्राप्त होण्याची आशा बळकावली आहे अल्पसंख्यांक समाजाच्या ग्रामीण व शहरी भागांमध्ये अनेक वेळा विविध योजनेतून हासमाज दुर्लक्षित झालेला आहे ठिकाणी झोपडीत वास्तव्य करून ऊन पाणी ताप तडाखा सहन करावा लागत असे अनेक वेळा इंदिरा आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना पासून हा समाज लाभापासूनपासून वंचित असल्याचे वाढत्या झोपडपट्टी वरून दिसते विकासाच्या प्रवाह मध्ये सहभागी करून घेण्यासाठी निवारा ची नितांत गरज होती समाजाला स्वतंत्र आवास योजना तयार करून मा फातिमा आवास योजना नामकरण करण्याच्या मागणीची दखल मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्याने मागणी केली होती मुख्यमंत्री यांनी मागणीची दखल घेतल्याने अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या सर्व स्तरातून आनंद व्यक्त होत असून जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सय्यद आबिद अली यांना मुख्यमंत्री कार्यालंय क डुन उपरोक्त मागणी संबधात कार्यवाहीचे निर्देश दिल्याचे कळविले आहे अल्पसंख्यक कल्याण मत्री नवाब मलीक यांना ही निवेदन देऊन योजने ला मुर्त रुप देण्याची मागणी केली आहे.