पालकमंत्र्याना चंद्रपुरात डॉक्टर नको, दारू हवी.

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्ह्यातील जनता महत्त्वाची का दारू?

चंद्रपूर जिल्ह्यातील रोज कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढत आहे, रोजच्या रोज वाढत असलेल्या संख्येमुळे आरोग्यविभागाची परिस्थिती फार दिवसेंदिवस नाजूक होत आहे,एकिकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना, कोरोना रुग्णांना सांभाळणारे डॉक्टर मात्र बोटावर मोजण्या इतकेच आहे. पालकमंत्री विजय वङडेट्टीवार यांनी यापुर्वी डॉक्टर संख्या कमी आहे हे स्पष्ट केलं होतं.

कोरोना रुग्णाना बेड मिळत नाही अशी ओरड सुरूच आहे. मोजक्या डॉक्टर समोर हजारो संख्येचे कोरोना रुग्ण अशी गत असतांना, कोरोनामुळे रुग्ण दगावत नसून पुरेश्या सोई नाही ,डॉक्टर नाही यामुळे रोज मरणाऱ्याची संख्या अशी स्थिती असताना अजूनही डॉक्टर उपलब्ध करून देण्यात पालकमंत्री विजय वडेट्टीवार अपयशी ठरले आहे.

एकंदरीत काय तर चंद्रपुरात कोरोना फास दिवसेंदिवस पुढे वाढणार आहे त्यावर उपाय योजना करणे सोडून, जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी पालकमंत्री धावपळ करतांना दिसते यावरून पालकमंत्री किती कार्यक्षम आहे हे लक्षात घ्या, चंद्रपूर जिल्ह्यातील जनता महत्त्वाची का दारू? यावर दारू ला प्राधान्य देऊन, पालकमंत्र्याला जिल्ह्यातील किती काळजी आहे हे लक्षात येते.


जिल्ह्यात उद्योगधंद्यांची वाट लागली आहे आर्थिक परिस्थिती बेताची असतांना उपासमारीची पाळी येऊन ठाकली आहे. जनता कर्फ्यु, लाकडाऊन ने जनतेचे आर्थिक कंबरडे मोडूनही अजून दिवसेंदिवस परिस्तिथी हाताबाहेर जात असताना, रोजचे अनेक जीव डॉक्टर नसल्याने जात आहे.

जिल्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करणे सोडुन जिल्ह्यातील बंद असलेली दारू सुरू व्हावी यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांचे प्रयत्न करणे म्हणजे ते चंद्रपुर जिल्ह्यातील जनतेची चेष्टा करत आहेत का? अशी चर्चा जिल्ह्यात सर्वत्र सुरू आहे.