(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:-उत्तरप्रदेशातील हाथरस मध्ये मनीषा वाल्मिकी या मुलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार, व तिच्या मृत्यूने देशभरात असलेला आक्रोश चंद्रपूर शहरात सुद्धा बघायला मिळाला.
मनीषा वर अमानवीय कृत्य करणारे त्याच गावातील उच्च जातीचे मूल, त्या मुलीची तक्रार सुद्धा घ्यायला स्थानिक पोलिसांनी तब्बल 8 दिवस लावले, इतकेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने पोलिसांनी मनिषाचा मृतदेह मध्यरात्री जाळून टाकला.
या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात बघायला मिळाले, यावर मुख्यमंत्री सुद्धा काहीही न करण्याच्या भूमिकेवर होते.
या घटनेविरोधात चंद्रपूर शहरातील विविध सामाजिक महिला संघटनांनी एकत्र येत कॅडलं मार्च काढून घटनेचा निषेध व संताप व्यक्त केला.
स्थानिक जटपुरा गेट परिसरात मनिषाला न्याय देण्याची मागणी करीत श्रद्धांजली देण्यात आली.
आरोपीना तात्काळ फाशी व्हावी अशी मागणी सुद्धा उपस्थित महिला संघटनांनी केली.
यावेळी शहरातील नाहीद काजी, डॉ. अभिलाषा गावतुरे, माया कोसे, करुणा चालखुरे, कौसर खान, नखत, अल्फिया, दरक्षा शेख, उजमा, फरजाना, स्वीटी भोयर, डॉ. सिराज खान, डॉ. राकेश गावतुरे उपस्थित होते.