आयडिया- व्होडाफोन आऊट ऑफ रेंज, सकाळपासून नेटवर्कच नाही..


आयडिया- व्होडाफोनची महाराष्ट्रातील सर्विस ढेपाळली.
Bhairav Diwase. Oct 15, 2020


Vodafone आणि Idea या दोन कंपन्यांचे एकत्रिकरण झाल्यानंतर VI या नावाने या कंपनीचे नेटवर्क ओळखले जाते. कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड होऊन VI ची महाराष्ट्रातील सर्विस ढेपाळली आहे. काल पुण्यात तर आज सकाळपासून महाराष्ट्राच्या अनेक भागात नेटवर्क डाऊन असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे आपला संताप ग्राहक सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. तसेच मिम्सच्या माध्यमातून कंपनीला ट्रोल केले जात आहे.

राज्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे बुधवारपासूनच अनेक भागात व्होडाफोन आणि आयडियाचे नेटवर्क डाऊन झालेले आहे. त्यामुळे मोबाईल ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.




आयडिया- व्होडाफोन नेटवर्क जे आता VI म्हणून ओळखले जाते, त्याची आज सकाळपासून नेटवर्क नसल्याची तक्रार वापरकर्त्यांनी केली आहे. हा विषय ट्विटरवर सध्या ट्रेण्डिंगला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने