गोंडपिपरी भाजपा महिला आघाडी, भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राज्य सरकार विरोधात आंदोलन.

Bhairav Diwase

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गोंडपिपरी तर्फे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.
Bhairav Diwase. Oct 12, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- भारतीय जनता पार्टी महिला आघाडी गोंडपिपरी तालुक्याच्या वतीने महाराष्ट्रात महिलावरील दिवसेंदिवस वाढते अत्याचार लक्ष्यात घेता, अजूनही सरकार महिला अत्याचाराविषयी गंभीर नाही या झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी व सोबतच विविध मागण्यासाठी गोंडपिपरी भाजपा महिला आघाडी, भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने माजी मंत्री माननीय आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार,माननीय श्री हंसराजजी भैया अहीर माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री, माननीय श्री देवरावभाऊ भोगळे भाजपा जिला अध्यक्ष चंद्रपुर, यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील आघाड़ी सरकारला धडा शिकवण्यासाठी मोर्चाद्वारे आंदोलन करण्यात आले होते.




१)कोरोणामुळे कडकं लॉक डाऊन काळातील चार महिन्याचे वीज बिल त्वरीत माफ करा.

२) पात्र शेतकऱ्याचे कर्ज पुनर्गठन केल्याने कर्ज माफ झाले नाही अश्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज त्वरीत माफ करा.

३) सर्वाधिक महिला अत्याचाराचे गुन्हे महाराष्ट्रात घडत आहेत, महिलांवरील अत्याचार थांबवा.

 ४) येनबोधला येथील अत्याचार ग्रस्त बालिकेला आर्थिक मदत देवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या.
 
 वरील मागण्यांकरिता भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात भव्य रॅली काढून गोंडपिपरी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात भाजपा पदाधिकारी, महिला आघाड़ी, युवा मोर्चा आघाड़ी, विद्यार्थी आघाडी, जिला परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, शाखा पदाधिकारी, नगरसेवक, विविध आघाड्या, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होते