कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- पंचायत समिती सावलीचे माजी सभापती, कांग्रेस पक्षाचे युवा नेते, सामाजिक कार्यकर्ते, सर्वांचे मन मिळावू व्यक्तिमत्त्व श्री. राकेश गड्डमवार यांची सावली तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर सदस्य पदी श्री. मोतीलाल दुधे, सौ. तृप्ती एस. संगीडवार, श्री.अनिल म्हशाखेत्री, श्री. दिवाकर काचिनवार, श्री. निलेश वाढणकर, श्री. हर्षलकुमार डोईजड, श्री. नितीन गोहणे, श्री. दिलीप लटारे, श्री. मसाजी मंगरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्ती बद्दल त्यांचे व या योजनेच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या सर्व नवनियुक्त सदस्यांचे परिसरात अभिनंदन करण्यात येत आहे. व बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी प्रकरणे मार्गी लागण्याची व अडलेल्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. असे परिसरातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे.