Click Here...👇👇👇

नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात खांबाळा येथील इसम जागीच ठार.

Bhairav Diwase
वनविभागाने नरभक्षी वाघाचे बंदोबस्त करून गावकऱ्यांना दहशतीतून लवकर बाहेर काढावे; गावकऱ्यांची मागणी.
Bhairav Diwase. Oct 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील अनेक खेड्या गावालगत मागील काही दिवसांपासून वाघाची दहशत वाढत चालली आहे. त्यामुळे गावातील लोकांना शेतात कामासाठी जाणे सुद्धा जीव गमावण्या इतपत झाले आहे. या नरभक्षी वाघाची दहशत या परिसरात खूप वाढली आहे.
      या पिसाळलेल्या दहशती वाघाद्वारे काल दि. 5 ऑक्टोबर 2020 रोजी सोमवारला सायंकाळी वाघाने खांबाळा येथील मारोती पतरु पेंदोर वय 65 या इसमावर हल्ला करून जागीच ठार केले. या घटनेमुळे खांबाळा आणि त्या लगतच्या असणाऱ्या गावांतील लोकांचा मनामध्ये दहशतिचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने लवकरात लवकर नरभक्षी वाघाचे बंदोबस्त करून गावकऱ्यांना दहशतीतून बाहेर काढावे अशी चर्चा गावकऱ्यात चालू आहे.