Click Here...👇👇👇

पोंभूर्णा येथे विश्व पैदल चाल रॅलीचे आयोजन.

Bhairav Diwase
महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी स्वेच्छेने सहभागी.
Bhairav Diwase. Oct 06, 2020


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत, द असोसिएशन फॉर इंटरनॅशनल स्पोर्टस् फॉर ऑल चंद्रपूर तथा चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, पोंभूर्णा, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०४ ऑक्टोंबर, २०२० ला पोंभूर्णा येथे विश्व पैदल चाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
  विश्व पैदल चॉल रॅलीचे उदघाटन मा. प्राचार्य डॉ. एन.एच. पठान, मा. प्राचार्य डॉ. टी.एफ. गुल्हाने, मा. प्राचार्य डॉ. सुधीर हूंगे, यांच्या हस्ते करण्यात आले. सदर रॅलीचे आयोजन महाविद्यालयापासुन वनविभाग अतिथी गृहापर्यंत करण्यात आली.
   रॅलीचे आयोजन करण्यामागचा उद्देश शरीर सुदृढ राहण्याकरीता, रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याकरीता, श्वसन क्षमता वाढविण्याकरीता रक्तसंचारणासाठी तसेच फुप्पुस मजबुत राहण्याकरीता रॅलीचे आयोजन करण्यात आले.
    या कार्यक्रमात तिनही महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेत्तर कर्मचारी स्वेच्छेने सहभागी झाले होते यामध्ये शरीराचे ऑक्सीजन लेव्हल तपासुन तापमान मोजण्यात आले तसेच सहभागी सर्वानी सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन रॅलीचे आयोजन करण्यात आले. 
     रॅलीच्या यशस्वीतेकरीता प्रा. शैलेन्द्र गिरीपुंजे, प्रा. संतोषकुमार शर्मा प्रा. संघपाल नारनवरे, शारीरीक शिक्षण व क्रीडा विभागाद्वारे करण्यात आले.