(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- घुग्घुस येथील घुग्घुस बचाव समितीच्या वतीने उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामुहिक लैंगिक अत्याचार व हत्या प्रकरणातील युवतीला न्याय मिळवून देण्यासाठी व अमानवीय घटनेच्या निषेधार्थ घुग्घुस बचाव समितीच्या वतीने आज सोमवारला रात्री ७ वाजता राजीव रतन चौक ते गांधी चौक पर्यंत कँन्डल मार्च काढण्यात आला.
यावेळी नारेबाजी व घोषणा देत कँन्डल मार्च गांधी चौकात धडकला तिथे पिडीत युवतीच्या प्रतिमे समोर मेनबत्ती लावण्यात आल्या व दोन मिनीट मौन पाळण्यात आले.
या कँन्डल मार्च मध्ये राजु रेड्डी, रोशन पचारे, पवन आगदारी, शरिफ सिद्दीकी, तौफिक शेख, सुरज कन्नुरी, शेखर तंगलपेल्ली, सिनु गुडला, शहजाद शेख, प्रशांत सारोकर, संजय कोवे, बालकृष्ण कुलसंगे, सुनिल पाटील उपस्थित होते.