मदन बोरकरच्या उपोषणाला भाजपा, सेना, मनसे, आरपीआय पक्ष झाले आक्रमक.

Bhairav Diwase

नगर परिषदचे समोर घोषणा देऊन केले न प चे निषेध.
Bhairav Diwase. Oct 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर शहरात मागील आठ दहा महिन्या पासून प्रशासना कडून शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत चालले असून याकडे स्थानिक शासन सुस्त बसली आहे.रोज तक्रारी न प ला येऊनही कुठलीही दखल घेतल्या जात नाही.अनेकदा वृत्तपत्रात बातमी झडकूनही सताधारी गप्प का असा प्रश्न गडचांदूर वासींना पडला आहे भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकरांनी मागील चार
 महिन्यापासून येथील झालेल्या घनकचरा व्यवस्थापन ठेक्यात भ्रष्ट्राचाऱ्या ची उच्च चौकशी करिता 
 मा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कुठलीही चौकशी केली नाही.शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजत आहे डेंग्यूचा प्रादुर्भाव जोमाने वाढत आहे.आठ-दहा लोकांचे डेंगू सारख्या रोगाने जीव गेले आहे तर कित्येक नागरिक मृत्यूशी झुंज देत आहे.मदन बोरकर यांनी घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारा कडून करारनाम्या नुसार काम न करून घेता संगनमताने खोटे बिल तयार करून भ्रष्ट्राचार केला असल्याचा आरोप केला असून त्याची उच्च स्तरीय चौकशी व्हावी ठेकेदाराचा परवाना काळ्या यादीत टाकण्यात यावे व दोषी अधिकारी विरुद्ध उचित कार्यवाई व्हावी अशी मागणी करीता दि ३०/९/२०२० पासून अन्नत्याग उपोषण चालू केले आहे.आज सहा दिवस लोटूनही त्याची जिल्ह्यातील शासन प्रशासन दखल घेत नाही.मदन बोरकर यांची मागणी जनहितार्थ असल्याने दि.३/९/२०२० ला भाजपा,सेना,मनसे,आरपीआय कवाडे व आठवले गटांनी एक दिवसीय लक्षणिक उपोषण करून पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला आहे व आज नगर परिषद पुढे घोषणा बाजी करून नगर परिषद च्या घनकचरा व्यवस्थापन ठेक्याची चौकशी करून ठेका रद्द करावा,व परवाना काळ्या यादीत टाकावे ,भ्रष्ट्र अधिकारी विरुद्ध कार्यवाई करण्यात यावी अश्या घोषणा देण्यात आल्या. तरीपण सदर मदन बोरकरांच्या मागणी कडे शासनाने/प्रशासनाने लक्ष दिले नाही तर यापेक्षाही मोठे आंदोलन भाजपा, सेना, मनसे, आरपीआय पक्ष्याकडून करण्यात येईल.उपस्थित भाजपा, सेना, मनसे, आरपीआय च्या नेत्यांनी आपल्या भाषणात म्हटले. यावेळी भाजपा चे नगरसेवक अरविंद डोहे, रामसेवक मोरे, शिवसेना नगरसेवक धनंजय छ्याजेड, सागर ठाकुरवार, मनसेचे महालिंग कंठाळे, सुरेश कांबळे, भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर, निलेशजी ताजने, हरिभाऊ घोरे, संदीप शेरकी, अरविंद कोरे, शिवसेना कार्यकर्ते प्रणित अहिरकर, अक्षय गोरे, व इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. आता यावर प्रशासन काय निर्णय घेतील याकडे सम्पूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.