14 वर्षीय मुलगी बेपत्ता.

Bhairav Diwase
कुठेही आढळल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सुरज ए. भोसकर राजुरा
राजुरा:- राजुरा शहरातील आझाद चौकात राहणारी मुलगी नेहाबानो सय्यद अली वय १४ वर्षे ०३ महिने तिने गुलाबी रंगाचा टॉप व काळया रंगाची लेगिंग परिधान केले आहे. ही मुलगी कालपासून घरून निघुन गेली असुन आई वडीलांच्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद केली असुन बेपत्ता मुलीचा शोध सुरू आहे.

राजुरा पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर नंबर ६०२/२०२०, नुसार नेहाबानो सय्यद अली वय १४ वर्षे ०३ महिने वर्ष उंची सुमारे ४ फुट, अंगाने सडपातळ, रंग सावळा, कानात सोन्याची बाळी , नाकात सोन्याची नथ, पायात चांदीची चाळ, घातली असुन ह्या मुलीला मराठी, हिन्दी भाषा उत्तम बोलता येतात.

तिच्यासोबत १५०००/-रू रोख रक्कम व सोन्याच्या काळया मनित गोठलेला मंगळसुत्र घेउन गेली आहे.
तरी सदरची मुलगी मिळुन आल्यास अथवा काही माहीती मिळाल्यास राजुरा पोलीस ठाणे, चंद्रपुर येथे खालील कमांकावर संपर्क करावा.
तपास अधिकारी:- श्री.एस.जी.झुरमुरे, सहा.पोलीस निरीक्षक,
राजुरा पोलीस ठाणे, चंद्रपुर.
मो.क.९५७९५५८२२६ राजुरा पोलीस ठाणे – ०७१७३ २२२१२८