शेवटच्या माणसाची सेवा करणे हेच भाजपचे लक्ष्य:- ब्रिजभूषण पाझारे.

Bhairav Diwase
बगड खिडकीतील ७० नागरिकांनी भाजपमध्ये केला प्रवेश.

भाजपात प्रवेश घेतलेल्या युवतीचा सत्कार 
Bhairav Diwase. Nov 06, 2020
चंद्रपूर:- भाजपचा विचार आता प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायाचा आहे. भारतीय जनता पक्ष राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देते. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्यांची सेवा करणे हे भाजपाचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य पाझारे यांनी केले. 
  

बगडखिडकी प्रभागात आयोजित भारतीय जनता पक्षात प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रशांत विघ्नेश्वर, गौतम नगराळे, योगेश किन्हेकर, राजू शेख, यश बांगडे यांची उपस्थिती होती. पाझारे म्हणाले की, भाजप सर्वसामान्य जनतेचा राजकीय पक्ष आहे. आता आम्हाला सूक्ष्मनियोजन करून काम करावे लागेल. यावेळी किमान बगड खिडकीतील ७० नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी शुभम बोकडे, अक्षय कुंभारे, अमन वाघ, तेजस काकडे , शमशेर शेख , तारा गिरडकर , प्रणाली वाघमारे, प्रीती वासेकर, पूजा गिरडक़र, अक्षता काकडे, रेणु रामटेके यांची उपस्थिती होती.