आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलीत.
Bhairav Diwase. Nov 06, 2020
चंद्रपूर:- माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मुल नगर परिषद क्षेत्रात प्रभाग क्र. 7 व 8 मधील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामांसाठी 5 कोटी 13 लक्ष 54 हजार 727 रू. निधी मंजूर करण्यात आलेला आहे. नगर परिषदांना वैशिष्टयपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. प्रभाग क्र. 7 साठी 2 कोटी 35 लक्ष 70 हजार 285 रू. तर प्रभाग क्र. 8 साठी 2 कोटी 77 लक्ष 84 हजार 442 रू. असा एकूण 5 कोटी 13 लक्ष 54 हजार 727 रू. निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात दिनांक 8 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयान्वये चंद्रपूर जिल्हयातील नगर परिषदांच्या विविध विकास कामांकरिता रू. 107.7223 कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सदर विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा करून मुल नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्र. 7 व 8 मधील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामांसाठी 5 कोटी 13 लक्ष 54 हजार 727 रू. निधी मंजूर करविण्यात यश मिळविले आहे. या निधीच्या माध्यमातुन प्रभाग क्र. 7 व 8 मध्ये अंतर्गत सिमेंट रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे.
या आधीही मुल शहरात आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने कर्मवीर मा. सा. कन्नमवार सांस्कृतीक सभागृह व स्मारक, प्रशासकीय इमारत, आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतीगृह, बस स्थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरण, क्रिडा संकुलाचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, 24 तास पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना, इको पार्क, आठवडी बाजार, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय, शहरातील मुख्य मार्गाचे सिमेंटीकरण, अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, पत्रकार भवनाचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, पंचायत समिती इमारतीचे बांधकाम, माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहाचे बांधकाम आदी विकासकामे मंजूर झाली असून यातील बरीच कामे पूर्ण झाली आहेत व काही प्रगतीपथावर आहेत.
मुल शहरातील प्रभाग क्र. 7 व 8 मधील रस्त्यांच्या कामासाठी 5 कोटी 13 लक्ष 54 हजार 727 रू. निधी मंजूर केल्याबाबत मुलच्या नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, चंद्रकांत आष्टनकर, अजय गोगुलवार, नगर परिषद सदस्य विनोद सिडाम, सौ. रेखा येरणे, सौ. शांता मांदाडे, सौ. वनमाला कोडापे, प्रशांत समर्थ, सौ. विदया बोबाटे, अनिल साखरकर, सौ. आशा गुप्ता, प्रशांत लाडवे, सौ. संगिता वाळके, सौ. वंदना वाकडे, महेंद्र करकाडे, मिलींद खोब्रागडे, सौ. प्रभा चौथाले, सौ. मनिषा गांडलेवार आदींनी आ. मुनगंटीवार यांचे अभिनंदन केले आहे.