Top News

वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेले 3 अल्पवयीन मुलं बुडाले

Bhairav Diwase.            Nov 21, 2020
चंद्रपुर:- घुग्गुस शहरातील १२-१५ वर्षांचा मुलांचा मित्रमंडळी चारपाच मुले आज शनिवारी सकाळी पोहायला गेली असताना. वर्धा नदी चिंचोली घाट पात्रात खोल पाण्यात अंदाज न आल्याने तीन मुले बुडाली असून ते वाहून गेले असून यामध्ये अनिल गोगला ( 15 ) व सुजल वनकर ( 16 ) हे दोघे बचावले असून पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन वानखेडे हे मुले नदीत वाहत गेल्याचे वृत्त आहे. पात्रात वाहत गेलेल्या मुलाचे मुलांचे शोधकार्य व शोधमोहीम सुरूच आहे.

        थोडक्यात माहिती नुसार आज शनिवारी दिनांक २१ नोव्हेंबर ला सकाळच्या सुमारास नाकोडा वरून 01 किलोमीटरवर असलेल्या वर्धा नदीवरील चिंचोली घाटावर घुगूस शहरातील पाच मुले पोहण्यासाठी गेली होती. या पाच मुलांना नदीतील खोल पाण्याचा अंदाज आला नसावा त्यामुळे त्यापैकी तीन मुले वर्धा नदी पात्रात बुडत जात असल्याचे प्रत्यदर्शी ट्रॅक्टर वाल्याना दिसले असता त्यांनी काही सुज्ञ लोकांना याची तात्काळ माहिती देऊन पोलीस ठाणे घुग्गुस ला कळविण्यात आले.
        
        पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असता यामध्ये अनिल गोगला (15) व सुजल वनकर (16) हे दोघे बचावले असून पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन वानखेडे हे मुले नदीत वाहत गेल्याचे वृत्त आहे. पात्रात वाहत गेलेल्या मुलाचे मुलांचे शोधकार्य व शोधमोहीम सुरूच आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने