भाजयुमो तर्फे प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा येथे भारतीय जनता युवा मोर्चा राजुरा विधानसभा क्षेत्रातर्फे देशातील प्रसिद्ध संपादक व पत्रकार अर्णब गोस्वामी यांना सूडबुद्धीने अटक करण्यात आली त्याबद्दल निषेध करण्यात आला.यावेळी महाराष्ट्राचे लोकनेते मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या सूचनेनुसार तसेच माजी आमदार अँड.संजय धोटे,भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे,जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,जिल्हा सचिव हरिदास झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
              जे प्रकरण बंद झाले होते ते प्रकरण सूडबुद्धीने बाहेर काढून महाविकास आघाडी सरकार आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम करीत आहे याला येणाऱ्या काळात जनता नक्कीच प्रतिउत्तर देणार असे यावेळी माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी सांगितले.

                    हे सरकार अनैतिकतेतुन निर्माण झाले असून या सरकारने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे तसेच देशातील या माध्यमातून पत्रकाराचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे याला येणाऱ्या काळात भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी सांगितले.
        
      यावेळी तालुका महामंत्री दिलीप वांढरे, भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने, भाजयुमो राजुरा तालुका अध्यक्ष सचिन शेंडे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार, तालुका महामंत्री रवी बुरडकर, संदीप गायकवाड, सचिन गुरनुले, कैलाश कार्ले कर, दीपक झाडे, छबिलाल नाईक, संदीप पारखी, विलास खिरटकर, सिद्धार्थ चांदेकर, वैभव पोटे, व भारतीय जनता युवा मोर्चातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.