(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांची विशेष उपस्थिती होती.भारतीय जनता युवा मोर्चातर्फे त्यांचा यावेळी हार व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे युवकांच्या प्रश्नांवर आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून दयावा तसेच राजुरा निर्वाचन क्षेत्रात संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावा असे अवाहन राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी यावेळी केले.
आपण भारतीय जनता युवा मोर्चातर्फे युवक,विद्यार्थी, तसेच समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रात अँड.संजय धोटे यांच्या माध्यमातून युवकांचे संघटन वाढवू असे प्रतिपादन यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, जिल्हा सचिव हरीदास झाडे, तालुका महामंत्री दिलीप वांढरे, भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने, भाजयुमो राजुरा तालुका अध्यक्ष सचिन शेंडे,विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार, तालुका महामंत्री रवी बुरडकर, संदीप गायकवाड, सचिन गुरनुले, कैलाश कार्ले कर, दीपक झाडे, छबिलाल नाईक, संदीप पारखी, विलास खिरटकर, सिद्धार्थ चांदेकर, वैभव पोटे, रत्नाकर पायपरे व भारतीय जनता युवा मोर्चातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.