सावली:- सावली तालुक्यातील हरांबा गावामध्ये दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गावातील दारू विक्री ही गावच्या विकासाच्या दृष्टीने बंद करण्यात आलेली होती. परंतु आता या कोरोनाच्या काळामध्ये गावातील दारू विक्रेते खूपच सक्रिय झालेले आहेत. दारूची विक्री ही आता लपून छपून न करता राजरोसपणे केली जात आहे. संध्याकाळच्या सुमारास दारू साठी गावात जत्रा लागत असते. आजूबाजूच्या गावातील लोक हे दारू पिण्यासाठी येत असतात. त्यामुळे गावातील शांतता भंग पावली आहे.
दारू पिणारेच एकमेकांसोबत नेहमी वाद घालून शिवीगाळ करत असतात. त्यामुळे गावातील सभ्य नागरिकांना , महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वेळीच या दारू तस्करांवर/विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करून गावातील दारू बंद करण्यात यावी अशी गावातील तरुणांची तसेच गावकरी लोकांची मागणी आहे. यामध्ये पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यसेच यासंबंधाने रितसररित्या कार्यवाही करण्यात यावी म्हणून वैनगंगा नदीकाठ बहुउद्देशीय संस्था हरांबा या संस्थेच्या माध्यमातून पोलीस निरीक्षक साहेब सावली, उपविभागीय पोलीस अधिकारी मूल तसेच पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन पाठवण्यात आलेले आहे.