(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन येथील युवा शेतकरी सुरेश बंडू दोरखंडे वय 40 वर्षे हा सकाळ च्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास सुरेश हा शेताकडे जातो म्हणून निघाला. बराच वेळ होउन घरी परत न आल्याने घरचे मंडळी शोधाशोध सुरू केली.मात्र वडस्कर यांच्या शेतालगत असलेल्या झाडाला गडफास लावले असल्याचे गुराखाचा लक्षात आले तेंव्हा तो ही माहिती गावकर्यांना दिली.
सुरेश दोरखंडे यांचे कडे चार एकर शेती आहे. या वर्षी परतीच्या पावसाने शेतीचे फार मोठी नुकसान केले. शेतातील सोयाबीन, कापुस ही नगदी नुकसान झाल्याने सुरेश काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. बँक ऑफ इंडियाचे 20 हजाराचे कर्ज ही होते.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुरेश दोरखंडे हा पैशाच्या त्रासामुळे, शेतीचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक विवंचनेत होता त्यामुळे स्वतः फाशी घेतली अशी गावकऱ्यात चर्चा आहे.
त्वरित पोलीस ठाणेदारांना ही बातमी कळताच पोलीस पथक तुरंत स्पॉटवर पोचून बॉडीचा पंचनामा करण्यात आला. पी.एस.आय .वडस्कर साहेब जमादार कुरसंगे मेजर यांनी तपास घेतला.
पोस्टमार्टम नंतर संपूर्ण माहिती देण्यास येईल अशी माहिती गोदावरी प्रतिनिधींना पोलिसांनी दिले आहे.