तालुका खरेदी विक्री संघ, राजुरा अध्यक्षपदी अशोकराव देशपांडे तर सचिव पदी वामन वाटेकर यांची निवड.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुऱ्याचे लोकप्रिय आमदार मा. सुभाषभाऊ धोटे यांनी राजुरा तालुका खरेदी विक्री संघाची रचना करून अध्यक्ष पदावर अशोकराव देशपांडे यांची निवड केली आहे. तर सचिव पदी वामन वाटेकर यांची निवड करण्यात आली आहे. अशोकराव देशपांडे हे जेष्ठ काँग्रेसी तसेच जिल्हा काँग्रेस कमेटीचे विद्यमान उपाध्यक्ष आहे. काँग्रेस पक्षातील त्यांची कामगिरी लक्षात घेऊन त्यांची वरील पदावर निवड करण्यात आली आहे.
        वामन वाटेकर हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवृत्त सचिव असून त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सखोल माहिती आहे. या दोनही अनुभव व्यक्तींची अध्यक्ष व सचिव पदावर निवड केल्याने सामान्य शेतकऱ्यांच्या समस्या सुटण्यास मदत होऊ शकते.
       या पदावर निवड केल्याबद्दल अशोकराव देशपांडे व वामन वाटेकर यांनी आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे आभार मानले आहे. अशोक देशपांडे व वामन वाटेकर यांच्या निवडीबद्दल राजुरा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष रंजन लांडे, दादा पाटील लांडे, डॉ. उमाकांत धोटे, सय्यद लखावत अली व इतर कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.