ओबीसी समाजाच्या संविधानिक न्याय मागण्या पुर्ण करा.

Bhairav Diwase
राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका पोंभुर्णा चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- ओबीसी समाजातील अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत त्या त्वरीत सोडविण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघ पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने मा. मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली आहे.
      ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, ओबीसी समाजाचे चंद्रपुर, गडचिरोली, यवतमाळ, नंदुरबार,धुळे, ठाणे, नाशिक, पालघर या जिल्ह्यातील आरक्षण १९ टक्के करण्यात यावे.केंद्र सरकारच्या १००% बिंदू नामावली मार्गदर्शक सूचना नुसार त्वरित सुधारणा करण्यात यावी. महाराष्ट्र राज्यातील प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा २०१९ त्वरीत लागु करण्यात यावे.महाज्योती संस्थेला एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी.ओबीसी आर्थीक विकास महामंडळास एक हजार कोटींची तरतूद करण्यात यावी.ओबीसी समाजाच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी.ओबीसी कर्मचार्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करण्यात यावे.ओबीसी शेतकऱ्यांना पेंशन योजना सुरू करण्यात यावी. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे.ओबीसी शेतकऱ्यांना १००टक्के सवलतीवर योजना सुरू करण्यात यावी.ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात यावी.धनगर समाजाच्या १ हजार कोटी रुपयांची अंमलबजावणी करण्यात यावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सर्व ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांना लागु करण्यात यावी. महात्मा फुले यांचे समग्र वांड:मय १०रु ला उपलब्ध करून देण्यात यावे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठि तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र वाचनालयाची स्थापना करण्यात यावी. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ओबीसी विभागाचे कार्यालय सुरू करण्यात यावे. अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका पोंभुर्णा तर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र सरकार मधील सर्व मंत्र्यांना निवेदन देण्यात आले.सदर निवेदन पोंभुर्णा तहशीलदार मार्फत देण्यात आले.निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे पोंभुर्णा कार्याध्यक्ष वसंत भोयर, तालुका अध्यक्ष प्रदीप दिवसे, सचिव सुधाकर ठाकरे,हरीश ढवस, विजय वासेकर, पांडुरंग पिंपळकर, जे.आर.कोपावार, नगरसेवक मोहन चलाख, एम.एस.देऊरमले,मनोज बुरांडे, दिलीप मॅकलवार, जेष्ठ नेते मधुकर ढोंगे, जेष्ठ नेते अशोक सातपुते,संजय कोटकर,लंबोदर वडस्कर,राजु गोबाटे,अमोल माथनकर, संजय गोडे, प्रविण निमसटकार, रोषण गेडाम, रवि उईके, अजय कासवटे, कार्तिक ताजने, योगेश पेंटेवार, नितिन मत्थे, देठे, गायकवाड, गौरकार, सुरेंद्र येलीजपुरवार, व्यंकटेश चलाख, तुकाराम चिवंडे, देवानंद रामटेके, सुभाष मारबते, संजय पठाण, महेंद्र वनकर व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होत.
      
       जर या मागण्या मान्य न झाल्यास हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनावर घेराव करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.