सावली:- केंद्र शासनाच्या खरीप २०२०-२१या वर्षीच्या उत्पादीत शेतमालाची कीमान आधारभुत कींमती आधारीत खरेदीच्या अधीन सावली तालुक्यात सध्या तीन खरेदी केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांपैकी सावली सेवा सहकारी संस्थेच्यावतीने आज बुधवारला संस्थेचे अध्यक्ष अनिल स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ करण्यात आले.शासनाने आधारभुत कींमती पेक्षा कमी दरा त धान खरेदी करण्यात येवु नये असा शासन निर्णय असला तरी बोनसची घोषना शासनाने केली नाही.
सदर केंद्रात खरीप कालावधी १आक्टोंबर २०२० ते मार्च२०२१या कालावधीत अ दर्जा असलेल्या धानाची १८८८रू, तर साधारण धानाची कीमत १८६८रू, प्रती क्विंटल या किंमतीत शेतकऱ्यांना आपले धान विक्री करता येणे शक्य आहे.
मात्र धान विक्रीस आणतांना धान साफ करून आणावे, धानात १७टक्के पेक्षा जास्त (आद्रता) ओलावा नसावा, धान आणण्या पुर्वी आनलाईन नोंदणी करून टोकण प्राप्त करून घ्यावे,
असे आव्हान संस्थेच्या वतीने शेतक-यांना करण्यात आले,
या प्रसंगी संस्थेचे संचालक दिवाकर भोयर, मुक्तैश्वर भोपये, गजानन आदे, चक पीरंजीचे उपसरपंच अनील रायपुरे, पत्रकार दिलीप फुलबांधे, कुसुमाकर वाकडे, कीसन आदे, मुरलीधर बोलीवार, कालीदास गावळे, सोमा मांदाडे, राजु चौधरी, आणि सचिव प्रवीण ईयापुरवार उपस्थीत होते,
,


