पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा युवा मोर्चा ची नियोजनात्मक बैठक पार पडली.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 21, 2020
चंद्रपूर:- एक डिसेंबरला होणाऱ्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्राचे लोकनेते माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूर येथे बैठक घेण्यात आली या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. देवरावजी भोंगळे व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री. आशिषजी देवतळे तसेच भाजपा जिल्हा महामंत्री श्री.नामदेवजी डाहुले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती आणि सोबतच भारतीय जनता युवा मोर्चाचे 22 मंडळाचे मंडळ प्रभारी ज्यामध्ये
बल्लारपूर शहर - श्रीकांत आंबेकर,
बल्लारपूर ग्रामीण- नितीन येल्लोरे,
*पोंभुर्णा तालुका - अजय मस्के,
मुल शहर - प्रशांत बोभाटे,
मुल ग्रामीण - मुन्ना कोटगले,
चंद्रपूर ग्रामीण - संजय यादव,
चंद्रपूर ग्रामीण - अनिल डोंगरे,
ब्रह्मपुरी ग्रामीण - रामलाल डोनाळकर,
सिंदेवाही तालुका - रितेश अलमस्त,
सावली तालुका - पुनम झाडे,
ब्रह्मपुरी शहर - सुयोग बाळबुधे, वरोरा ग्रामीण - सुरज धात्रक,
वरोरा शहर - महेश श्रीरंग, भद्रावती शहर - इम्रान खान,
भद्रावती ग्रामीण - केतन शिंदे,
जिवती तालुका - महेश देवकते,
गोंडपिपरी तालुका - राकेश पून, 
कोरपना तालुका - आशिष ताजणे,
राजुरा ग्रामीण - सचिन शेंडे,
राजुरा शहर - मोहन कलेगुरवार,
नागभीड तालुका - देवानंद बावनकर, चिमूर तालुका - किशोर मुंगले, मनीष वासमवार व आदित्य शिंगाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.