चंद्रपूर जिल्ह्यात काही भागात पाऊस.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 20, 2020

चंद्रपूर:- जिल्ह्यातील चंद्रपूर, पोंभुर्णा, बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, राजुरासह आणखी काही तुरळक ठिकाणी सायंकाळी हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळला, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे वृत्त आहे. चंद्रपूरचा पारा मागील आठवड्याच्या सुरुवातीला कमालीचा घसरला होता. ९ नोव्हेंबरला येथे ८.६ अंश सेल्सीअस किमान तापमान नोंदविले गेले होते. त्यावेळी राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली.त्यानंतर दिवाळीत तापमानात काहीशी वाढ झाली.