(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजूरा तालुक्यातील तुलाना येथील तलावात पोहताना त्यात बुडून गावातील सेवन वसंत ठाकरे, वय 18 या युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे राजुरा जवळील तुलाना या गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी एक वाजता तुलाना गावातील चार तरुण गावाजवळील माजी मालगुजारी तलावात पोहायला गेले होते. या चौघांनी काठावर कपडे व चपला काढून चौघांनीही तलावात उड्या घेतल्या. पोहत असताना अचानक सेवन हा दिसेनासा झाला. सेवन च्या समोर एक तरुण पोहत होता, त्याला ईतर मित्रानी तलावा बाहेर काढले, मात्र सेवन चा पत्ता लागला नाही. अखेर या मुलानी गावात येऊन माहिती दिली.
घटनेची माहिती विरूर स्टेशन पोलिसाना देण्यात आली. पोलिसानी कोळ्यांच्या सहाय्याने प्रेताचा शोध घेणे सुरू केले. मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत शोध लागु शकला नाही. अद्यापही त्या तरुणाचा शोध लागलेला नाही. तलावात पाणी भरपूर आहे. रात्र झाल्यामुळे पोलिसानी शोधकार्य थांबविले आहे.