वरोरा:- येथील वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार तालुक्यातील काही शेतकरी यांनी प्रहार शेतकरी संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष यांना कथित केल्या कि, आम्ही दोन ते तीन वर्ष झाले आहे. आम्ही कृषी पंप साठी डिमांड भरले आहे परंतु वीज जोडणी केलेली नाही. असे सांगितले असता. त्या शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीत बोलावून तेथील उपअभियंतास बोलणे करून ३१ मार्च २०१८ च्या अगोदर डिमांड भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना आठ दिवसात वीज जोडणी केली जाईल असे सांगितले. परंतु ३१ मार्च २०१८ नंतर भरलेल्या शेतकऱ्यांना वीज जोडणी द्यायचे अधिकार मागील सरकारने बंद केले आहे. म्हणून त्यांची अजून पर्यंत वीज जोडणी केली नाही. या साठी सरकार दोषी आहे असे त्या अभियंता यांनी प्रहार कार्यकर्ते यांना सांगितले. हे ऐकून प्रहार कार्यकर्ते संतप्त होऊन त्या अधिकाऱ्यांचा शाल व श्री फळ देऊन सत्कार करून, येत्या आठ दिवसात सर्व शेतकऱ्यांना वीज जोडणी करण्यात यावी अन्यथा प्रहार स्टाईलने आंदोलन केले जाईल असे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार सेवक संदीप झाडे, राहुल वाघ, बाळू लांडे, किशोर डुकरे व तालुक्यातील शेकडो शेतकरी हजर होते.
महामंडळ वीज वितरण कंपनीच्या कामचुकार अधिकाऱ्यांचा सत्कार करून दिले निवेदन.
शनिवार, नोव्हेंबर २१, २०२०


