दिवाळीच्या निमित्ताने वरुर रोड येथे युवकांनी केली स्वच्छता जनजागृती.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- शुभ दीपावलीच्या निमित्ताने जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथील युवकांमार्फत ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आली. लॉकडाऊन मुळे अनेक ठिकाणी केरकचरा , प्लास्टिक पोलिथिन जमा झालेला होता.

प्लास्टिक मुळे होणाऱ्या मृदा प्रदूषण व इतर होणारे आजार कमी करण्यासाठी गावातील सार्वजनिक वाचनालयातील युवकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, रस्ते, तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथील परिसर स्वच्छ करून गावकऱ्यांना स्वच्छतेचा मंत्र दिला. गोळा केलेला केरकचरा ग्रामपंचायत कार्यालय वरूर् रोड यांच्याकडे सुपूर्द केले. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विशाल शेंडे, साहिल मडावी, प्रज्वल बोरकर, प्रवीण चौधरी, विनम्र शिंदे, मयुर जानवे, करन उरकुडे सहभागी झाले.