सिंदेवाही:- आज विदर्भ ऑटो चालक मालक संघटना चंद्रपूरचे सदस्य वसंता सुखदेवे राहणार चिखलगाव तालुका सिंदेवाही यांचा अचानक हृदय विकाराने मृत्यू झाला असून त्यांच्या पच्छात पत्नी व दोन मुले आहेत. ही घटना माहिती होताच ऑटो संघटनेचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री दिपक जी दाजगाये यांनी परिवाराला धीर सांत्वन करून आर्थिक मदत मिळवून दिलेली आहे.
जिल्ह्यातील संघटनेत असणाऱ्या चा चंद्रपूर येथील बहुजन हिताय चालक मालक सेवा सहकारी संस्था येथे काही आकस्मिक निधी जमा केल्या जातो त्यानुसार सभासदाचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना 75000 हजार एवढी रक्कम दिल्या जाते त्या नुसार मृतक कुटुंबाला निधीचे वितरण करण्यात आले. त्या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर जी हुमणे सचिव श्री कुंदन रायपुरे उपाध्यक्ष श्री मांडरे श्री मोक्षविर लोहकरे तथा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री दिपक दाजगाये तसेच ऑटो संघटनेचे चालक मालक उपस्थित होते.
बातमी संकलन:- प्रफुल्ल तुम्मे