राजुरा तालुक्यात कोंबडं बाजार दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुरू होणार….

Bhairav Diwase
तेलंगणा सिमेवर जंगी सामना कोंबड्यांचा!
 (आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील काही गावांमध्ये हौशी मंडळी आहेत त्यासोबतच इतरही आहेत. या वर्षी कोरोणामुळे काही धंद्यावर विपरीत परीणाम झाला आहे. तो धंदा कोंबडं बाजार या धंद्यात आता अनेक लोक वाट पहात होते. दिवाळीच्या शुभ पर्वावर तेलंगणा सिमेवर लकडडकोट च्या काही लोकांनी शेत तयार करुन, कोंबडं बाजार सुरू होत आहे. ज्या भागात हा बाजार भरणार आहे. तो भाग राजुरा तालुक्यात येत असल्याने, अनेकांनी कोंबडं बाजार संचालक यांचेकडे संपर्क साधून दिवाळी साजरी केली असल्याचे काही लोकांनी सांगितले असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. आता कापूस सोयाबीन निवाले आहे शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी काही ठराविक लोक कोंबडं बाजाराचे शौकीन आहे.